2020, During Lockdown...
लॉक डाऊनच्या काळात झूम आणि युट्युबच्या माध्यमातून सुरुवातीला सॉफ्टवेअरच्या डेमो करिता काम करण्याचे ठरविले.
मनात अनेक दिवसाची संपूर्ण व्याख्यान आयोजित करण्याची एक सुप्त इच्छा होती. तिला मूर्त स्वरूप देण्याचे ठरवले. आणि व्याख्यानाचे एका आठवड्याचे आयोजन केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे एकशे एक व्याख्यानाचा संकल्प केला.
३ जून ते १५ सप्टेंबर, २०२० या काळात हा संकल्प पूर्णत्त्वास गेला.
यात ईश्वरेच्छा, ईश्वरकृपा सर्व गुरुजनांचे आशिर्वाद, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या शुभेच्छा तसेच उत्सुकता असलेले असंख्य ज्ञानपिपासू ज्योतिषी, ज्योतिष प्रेमी श्रोते, दर्शक यामुळे हे शक्य झालं असं मी समजतो.
मोफत व सशुल्क मिळून आतापर्यंत एकूण सुमारे ३००० हून अधिक कार्यक्रमांची नोंद आहे.
१०१ कार्यशाळांचा संकल्प आहे. त्यापैकी ७५ कार्यशाळा झाल्या आहेत.
सर्व संस्थांचे सहकार्य लाभल्यास १०१ ऑनलाईन अधिवेशनं घ्यावेत, असाही मानस आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेतून फलादेशाची तयारी करून, मराठी ज्योतिषी सक्षम व्हावा यांकरिता व्यापक प्रयत्न सुरू आहेत.